Uncategorizedमहाराष्ट्र

Maharashtra Cabinet Meeting : मुंबई-ठाण्यातील नव्या मेट्रो मार्गिकेला मान्यता ते पुणे-लोणावळा लोकल मोठा निर्णय, जाणून घ्या आजच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये 14 निर्णय

Maharashtra Cabinet Decisions Today : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगरविकास आणि विधि व न्याय विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगरविकास आणि विधि व न्याय विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1 हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये मिळणार आहेत.

तर ऊर्जा विभागाने महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित केले. तर कामगार विभागाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 तसेच कारखाने अधिनियम 1948 मध्ये सुधारणा मंजूर केली.

आज (03 सप्टेंबर)च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णय पुढील प्रमाणे-

सामाजिक न्याय विभाग

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ
लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार.

ऊर्जा विभाग

महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित.

कामगार विभाग

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा.

कामगार विभाग

कारखाने अधिनियम, १९४८ मध्ये सुधारणा.

आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार

नगर विकास विभाग

मुंबईतील आणिक डेपो- वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका- ११ प्रकल्पास मान्यता. २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद

नगर विकास विभाग

ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका – २, मार्गिका – ४ तसेच  नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!