देश

पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प व प्रदूषण नियमंत्रण उपाययोजना यासह विविध विषयांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासन यांची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.

पिंपरी चिंचवड पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प व प्रदूषण नियमंत्रण उपाययोजना यासह विविध विषयांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, महानगर आयुक्त श्री. योगेश म्हसे, मुख्य अभियंता श्रीमती रीनाज पठाण, सह नियोजनकार श्रीमती. श्वेता पाटील, सहआयुक्त श्री. हिम्मत खराडे, सहआयुक्त श्रीमती. दीप्ती सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता श्री. प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता श्रीमती. अनिता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रास ‘‘हिंदूभूषण’’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत प्रस्ताव तयार आहे. त्यावर मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमआरडीएच्या मोकळ्या जागा आयटी हब आणि बँकींग क्षेत्रासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत लिलाव करण्यात येणार आहे, अशी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

इंद्रायणी व पवना नदी पात्रात प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्या, संबंधित गृहनिर्माण सोसायटी आणि आस्थापनांवर कठोर कारवाई करावी. नद्यांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणारी ठिकाणे (स्पॉट) निश्चित केली आहेत. त्या जागा ताब्यात असलेल्या ठिकाणी तातडीने सांडपाणी प्रक्रिया व मैलाशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली आहे.

पिंपरी-चिंचवडसह देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई कुदळवाडी येथे करण्यात आली. सुमारे 900 एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. या भागातील काही व्यावसायिक सभोवतालच्या परिसरात स्थलांतरीत झाले आहेत. पीएमआरडीए हद्दीमध्ये पुन्हा कुदळवाडीसारखा ‘‘भंगार हब’’ तयार होवू नये. या करिता प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. अनधिकृत कामांना पाठीशी घालू नये, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!